Homeटेक्नॉलॉजीफॅशन केवळ डिझाईन नाही, तर तुमची ओळख..संतोष कटारिया

फॅशन केवळ डिझाईन नाही, तर तुमची ओळख..संतोष कटारिया

पुणे: दि. फॅशन म्हणजे केवळ डिझाईन नव्हे, तर ती आपली ओळख असते. आपण केलेल्या प्रत्येक डिझाईनद्वारे जगाला त्यांच्या संस्कृतीची, वेशभूषेची एक कथा सांगितली जाते. त्यामुळे स्वतःच्या कल्पनांशी कायम प्रामाणिक राहा, सातत्याने नवकल्पना करत राहा आणि जगाला आणखी सुंदर बनवा, असे मत पेपरमिंट क्लोदिंग प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक संतोष कटारिया यांनी मांडले.

ते एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन (आयओडी)च्या फॅशन विभागाचा ११ वा वार्षिक ग्रॅज्युएशन फॅशन शो (जीएफएस) २०२६ निमित्ताने बोलत होते. याप्रसंगी ‘ग्लॅड यू केम अँड ग्लॅड वी मेट’चे संस्थापक मॅडी अमृतकर, सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर टीना रांका, विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा प्र-कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड, कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., प्रोवोस्ट डॉ. सायली गणकर, प्र-कुलगुरू डॉ. नचिकेत ठाकूर, प्रा. डॉ. दांडेश्वर बिसोई, तसेच फॅशन डिझाईन विभाग प्रमुख डॉ. अर्शिया कपूर आदी उपस्थित होते.

या फॅशन शोमध्ये २०२२–२०२६ या बॅचमधील बी.डिझ. फॅशन कम्युनिकेशन, बी.डिझ. फॅशन डिझाईन आणि एम.डिझ. फॅशन मॅनेजमेंट व मार्केटिंग या अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांनी डिझाईन कलेक्शन्स, फॅशन फिल्म्स, प्रकाशने आणि ब्रँडिंग प्रोजेक्ट्स सादर केले. प्रत्येक सादरीकरणातून विद्यार्थ्यांची वैयक्तिक डिझाईन ओळख आणि व्यावसायिक तयारी स्पष्टपणे दिसून आली.

यावेळी संतोष कटारिया यांनी बाजारपेठेचे आकलन आणि ग्राहकांची गरज समजून घेण्याचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच सर्जनशीलतेसोबत व्यावसायिक दृष्टीकोन आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच मॅडी अमृतकर यांनी विद्यार्थ्यांना मजबूत नेटवर्क तयार करण्याचा, सहकार्याला प्राधान्य देण्याचा आणि डिजिटल ओळख निर्माण करण्याचा सल्ला दिला.

विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला उपस्थित पालक व डिझाईन क्षेत्रातील विविध व्यावसायिक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एमआयटी एडीटीचा ग्रॅज्युएशन फॅशन शो हा उदयोन्मुख डिझायनर्ससाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरत असून, त्यांच्या व्यावसायिक प्रवासाची भक्कम सुरुवात असल्याचे मतही उपस्थितांनी मांडले.

“वेषभूषा ओळखीची प्रभावी भाषा – डॉ. मंगेश कराड
वेषभूषा ही केवळ बदलत्या ट्रेंड्स किंवा फॅशनपुरती मर्यादित नसून ती व्यक्तिमत्त्वाची प्रभावी अभिव्यक्ती आहे. आपण काय परिधान करतो यावरून आपल्या संस्कृती, मूल्ये, व्यक्तिमत्त्व आणि भावनांचे दर्शन घडते. सौंदर्यापलीकडे जाऊन वेषभूषा अर्थ आणि आठवणी जपते, ज्यामुळे व्यक्ती स्वतःकडे कसे पाहतात आणि इतर त्यांना कसे पाहतात, हे ठरते. अशा प्रकारे वेषभूषा ही ओळखीची एक मूक पण प्रभावी भाषा ठरते, जी वैयक्तिक असली तरी सर्वांना समजणारी आहे, असे प्रा.डाॅ.मंगेश कराड यांनी यावेळी व्यक्त केले”.
——————-

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

130 शिक्षकांच्या निलंबनाची प्रहारची मागणी, अपंगत्वाच्या दाव्याप्रकरणी 46 शिक्षकांवर कारवाई | पुणे बातम्या

पुणे झेडपीने 270 प्राथमिक शिक्षकांना त्यांच्या अपंगत्वाची पडताळणी करण्यास सांगितले. 140 जणांना ससून रुग्णालयाकडून प्रमाणपत्र मिळाले, तर उर्वरित 130 जणांना प्रमाणपत्र मिळाले नाही...

SPPU ने कॅश फॉर डिग्री घोटाळ्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली, कर्मचाऱ्याला निलंबित केले |...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्राच्या कथित रोख रकमेप्रकरणी बुधवारी पोलिसात तक्रार दाखल केली, ज्यामध्ये विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यावर...

‘हे आमचे मंदिर आहे’: दिल्लीतील पर्यटकांना महाराष्ट्राच्या लोहगड किल्ल्यावर धुम्रपान करण्यासाठी स्थानिकाने शिकविले

पुणे: महाराष्ट्राच्या ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावरील व्हायरल झालेल्या व्हिडिओने संरक्षित वारसा स्थळांवर पर्यटकांच्या वर्तनावर पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे.या क्लिपमध्ये किल्ल्याच्या तटबंदीवर...

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी डीएलटीए प्रमुख अनिल खन्ना

पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

फेरीवाले, नागरी समस्यांवर कालबद्ध कारवाईसाठी विमाननगरवासीय, नगरसेवकांचा पीएमसीवर दबाव

एकेरी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पुढील आठवड्यात अंमलबजावणी सुरू होईल, असे नगरसेवकांनी सांगितले पुणे : विमाननगर विकास समिती (VNVS) आणि नगरसेवकांच्या संयुक्त शिष्टमंडळाने मंगळवारी...

Translate »
error: Content is protected !!