परभणी:- परभणी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मानवत तालुक्यातील केकरजवळा गटातून शिवसेनेच्या (शिंदे गट) उमेदवार कौशल्याबाई तुकाराम शिंदे यांचा १५५३ या विक्रमी मतांनी विजय झाला.प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या भागीरथी रावसाहेब लाडाणे यांचा पराभव करत केकरजवळा गटात कौशल्याबाई शिंदे यांनी वर्चस्व सिद्ध केले. तर किन्होळा पंचायत समिती सदस्यपदी प्रमिला शिवाजीराव उक्कलकर यांचा विजय झाला.अटीतटीच्या लढतीत केकरजवळा गटात शिवसेनेचे मानवत तालुका प्रमुख व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कृष्णा शिंदे यांना सुरुवातीपासूनच युवकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. केकरजवळा गट ओबीसी महिला उमेदवारासाठी राखीव झाल्याने कृष्णा शिंदे यांच्या काकू कौशल्याबाई शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली. केकरजवळा गटातील केकरजवळा,इटाळी,उक्कलगाव, रत्नापूर,हत्तलवाडी,नागरजवळा ,किन्होळा
(बु.) मांडेवडगांव,पोहंडूळ,रामेटाकळी या सर्वच गावांमधून शिंदे यांना मोठा प्रतिसाद मिळाला.शिवसेनेचे नेते सईद खान यांच्या मार्गदर्शनाखाली व कृष्णा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हि निवडणूक कार्यकर्त्यांनी हातात घेतली होती.त्यामुळे विजय खेचून आणण्यात महत्वाची भूमिका ठरली. ‘आपण निर्विवादपणे आम्हाला विजयी करण्यात मोलाची भूमिका बजावली व यापुढे सर्वसामान्य मायबाप जनतेच्या अडीअडचणीत धावून जाणार’ असल्याचे शिवसेनेचे मानवत तालुका प्रमुख कृष्णा शिंदे यांनी केकरजवळा गटातील जनतेचे आभार मानले.या विजयामुळे कृष्णा शिंदे यांचा चेहरा मानवत तालुक्यात महत्वपूर्ण ठरणार आहे.
————————————-
इटाळी येथे शिंदे यांचे जंगी स्वागत:
विजयी झाल्यानंतर इटाळी (ब्रम्हनाथ) येथे कृष्णा शिंदे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे इटाळी ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी व जेसीबीतून गुलाल उधळून जंगी स्वागत केले.

✍🏻मुख्य संपादक – विलास तारे





















