पुणे.दि.२४.राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा संसदीय कार्य मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि समर्थ युवा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने कस्तुरबा गांधी वसाहत येथे आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव सौरभ कुंडलिक यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये तब्बल २५० नागरिकांनी सहभाग नोंदवला.या शिबिरात रक्तातील सर्व घटक तपासणी, रक्तदाब तपासणी, रक्तातील साखर तपासणी, कॉलेस्ट्रॉल तपासणी, डोळ्यांची तपासणी (मोतीबिंदू, काचबिंदू), दातांची तपासणी तसेच महिलांसाठी स्तन कर्करोग तपासणी अशा विविध महत्त्वपूर्ण तपासण्यांचा समावेश होता. सर्व तपासण्या एकााच ठिकाणी व मोफत उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे नागरिकांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.आरोग्य तपासणी शिबिरामुळे नागरिकांना प्राथमिक आरोग्य स्थितीबाबत जागृती मिळण्यासोबतच आवश्यक उपचारांचे मार्गदर्शनही मिळाले. समाजाच्या आरोग्यवर्धनासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

✍🏻मुख्य संपादक – विलास तारे
























